राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचेही आमदार फुटणार! : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

08 Jul 2023 15:24:37
Maharashtra Cabinet Minister Gulabrao Patil

मुंबई
: शिंदे गटाचे आमदार व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्ततव्याने आता खळबळ उडाली असून राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसचेही आमदार फुटण्याचा दावा त्यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, काँग्रसचे आमदारसुध्दा येतील पण कुणाकडे जातील याची माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसचे आमदारदेखील फुटणार असा दावा त्यांनी केला. तसेच, आपण काँग्रसचे आमदार फुटणार हे ऐकले आहे, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. दरम्यान, अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ होणार याचा दावा आपण दोन महिन्यांपूर्वीच केला होता आणि तो खरा ठरल्याचा पुनःच्चार गुलाबराव पाटील यांनी केला.
 
दरम्यान, दि. २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप घडला होता. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षातील ४० आमदारांनी फडणवीस-शिंदे सरकारात सामील होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पटाची शपथ घेतली असून त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.



 
Powered By Sangraha 9.0