सहकार अधिकारी, लिपीक पदासाठी सरळसेवा भरती! असा करा अर्ज!
07-Jul-2023
Total Views |
मुंबई : मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ७ जुलै २०२३ पासून करता येणार आहेत.
या भरती प्रक्रियेबाबतच्या सविस्तर तपशिलासह जाहिरात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.७ जुलै २०२३ रोजी पासून उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. ७ जुलै २०२३ (दुपारी १२.०० वा. पासून) ते २१ जुलै २०२३ रोजी (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत करता येतील, असे मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.