"शिंदेंसारख्या ज्युनिअर माणसासोबत काम करणार नाही, असं अजितदादा म्हणाले होते!"

05 Jul 2023 13:31:34
Sanjay Raut on Ajit Pawar

मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊतांनी एक सवाल उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार होते. त्यावेळी एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चात होते.त्यावेळी अजितदादा म्हणाले होते की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर अशा ज्युनिअर माणसासोबत काम करणार नाही. त्याच्यासोबत काम करणे आम्हाला कठिण जाईल.", असे विधान उपस्थित करत राऊतांनी जुन्या अटीचीच आठवण अजितदादाना करून दिली आहे.
 
05 July, 2023 | 13:34
दरम्यान दि. ५ जुलै रोजी वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाच्या बैठकीला सुरूवात होणार आहे. त्याचवेळी रुपाली चाकणकर एमईटी कॉलेज येथे दाखल झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे हे सांगण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. मात्र शरद पवार हे आमचे आदर्श होते आणि राहतील. म्हणूनच शरद पवारांचा विचार घेऊनच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे चाकणकर म्हणाल्या.


05 July, 2023 | 13:34

Powered By Sangraha 9.0