मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी 'मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान'च्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील पार्थडी येथील हुतात्मा बाबू गेनू संस्थेला रुग्णवाहिका भेट म्हणून दिल्या आहेत. भाजप आ. प्रसाद लाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन संस्थेचे सचिव तसेच भाजप युवा मोर्चाचे विशेष निमंत्रित सदस्य कुशल भापसे यांच्या रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान, यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड सपत्नीक उपस्थित होते.
दरम्यान, हुतात्मा बाबू गेनू संस्था नगर जिल्ह्यातील जनसामान्यांच्या सेवेकरिता कार्यरत असून गरजूंना या संस्थेचा लाभ मिळत असतो. त्यामुळे भाजप आ. प्रसाद लाड यांनी या संस्थेला केलेली मदत निश्चितच जनसामान्यांच्या सेवेत सदैव समर्पित भावनेने कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी ही रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून, या पुढील काळात देखील अशीच अविरत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.