शरद पवार हे खासगी मालमत्ता नाही, आव्हाडांनी गप्प बसावं : मिटकरी

05 Jul 2023 14:35:42

Amol Mitkari  
 
 
मुंबई : शरद पवार हे खासगी मालमत्ता नाही, आव्हाडांनी गप्प बसावं. असं अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे. शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. विचारसरणीचा विश्वासघात करणाऱ्यांनी शरद पवार यांचे फोटो वापरू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. यालाचं आता मिटकरी यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
 
अमोल मिटकरी म्हणाले, "शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली नाही. मात्र काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्यासाठी त्रासदायक आहे. शेवटी पवारसाहेब हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. फूट पाडणारे लोक आता जनतेच्या समोर आले आहेत."
 
"पवारसाहेब जितेंद्र आव्हाड यांची खासगी मालमत्ता नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जितेंद्र आव्हाडांच्या एकट्याची शरद पवार मालमत्ता नाहीत. त्यांनी असे बोलू नये, माझी त्यांना विनंती आहे. तसेच अजित पवार यांनी स्वत: जागा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालये उभारले आहेत. त्यामुळे कोणी तिथे दावे करु नये." असे मिटकरी म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0