सर्वात मोठी घडामोड : “अजित पवारच राष्ट्रवादीचे सुप्रीमो!”
05-Jul-2023
Total Views |
मुंबई : शरद पवारांविरुद्ध बंड करत अजित पवार फडणवीस- शिंदे सरकारमध्ये दि.२ जुलैला सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर दि. ५ जुलै रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाने बैठकीचं आयोजन केले होते. त्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ पसरवणारी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधी ३० जून रोजी अजित पवारांना पक्षाचा अध्यक्ष करावे , अशी याचिका अजित पवार गटाकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.
05 July, 2023 | 16:53
त्या याचिकेवर ४० आमदार आणि खासदारांच्या सह्या होत्या. त्यामुळेच अजित पवार गटाकडून शपथविधीच्या २ दिवसाआधीच राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यात आला होता. म्हणूनच आमदार आणि खासदारांकडून ३० जून रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले होते.दरम्यान अनिल देशमुख यांनी पक्षाच्या चिन्ह आणि पक्षावर शरद पवार गटाचा दावा केला आहे. तसेच शरद पवार हे काही दिवसात महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती ही देशमुखांनी दिली.
05 July, 2023 | 16:54
त्याचबरोबर एकदा नव्हे तीन-तीनवेळा राष्ट्रवादी भाजप सोबत जाण्याचे ठरलं होतं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला. शरद पवारांवर शरसंधान साधण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पवार माझे आजही दैवत आहेत, पण त्यांच्या राजकारणातील धरसोड वृत्तीमुळे आपल्या पक्षाची गाडी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अडकली, असा तीव्र शब्दांत समाचार त्यांनी नेतृत्वावर घेतला.
05 July, 2023 | 16:54
राष्ट्रवादी काँग्रेसला मधल्या काळात मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होत, तेव्हा संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मंत्री झाला असता, आजपर्यंत मुख्यमंत्रीपद आपल्याला टीकवता आलं असतं, असंही शरद पवार म्हणाले. २०१७मध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्यापूर्वी २०१४ मध्ये आम्ही सिल्वर ओकला होतो, तेव्हाही काही वेगळं करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी तेव्हा भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्हाला सांगितलं वानखेडेवर जा, आम्ही तिथेही गेलो. पण सत्तेत सामीलच व्हायचं नव्हतं तर मग तेव्हा वानखेडेला का पाठवलं?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.