उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांची पहिली मंत्रीमंडळ बैठक, नेमकं काय ठरलं?

04 Jul 2023 14:14:33

Cabinet meeting 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ४ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे सहकारी पहिल्यांदाच बैठकीला उपस्थित होते.
 
यावेळी आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.
 
 
 संबंधित बातम्या : 
 
04 July, 2023 | 14:20
 
 
04 July, 2023 | 14:20
 
कॅबिनेट बैठकीतील निर्णय :
 
* राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
( ऊर्जा विभाग)
 
* मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
(नियोजन विभाग)
 
• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
(जलसंपदा विभाग)
 
• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
(उद्योग विभाग)
 
• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
(विधि व न्याय विभाग)
 
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
(महसूल विभाग)
 
• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
(कृषि विभाग)
 
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
(पदुम विभाग)
 
 
 
Powered By Sangraha 9.0