"विश्वनेते आव्हाड यांना दादांचे नेतृत्त्व का मान्य नाही", अमोल मिटकरींचा निशाणा

04 Jul 2023 19:00:39

Amol Mitkari
 
 
 
मुंबई : अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी "विश्वनेते आव्हाड यांना दादांचे नेतृत्त्व का मान्य नाही?" असा सवाल शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात झालेल्या भुकंपानंतर राष्ट्रवादीत ही दोन गट पडले आहेत. तर, आता अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांना सवाल केला आहे.
 
अमोल मिटकरी म्हणाले, "विश्वनेते जितेंद्र आव्हाड यांना विचारा की, त्यांना अजितदादा यांचे नेतृत्त्व का मान्य नाही? त्यांनी आधी कायद्याचा अभ्यास करावा. नंतर बोलावे, सगळे आमदार आमच्याबरोबर आहेत. 40 आमदार, 3 अपक्ष आमदार आणि तीन विधान परिषदेचे आमदार हे सगळे दादांच्या बाजूने आहेत. तसेच त्यांनी अफिडेवीट लिहून दिले आहे." असं ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0