अजित पवारांसह नऊ जणांना कोणती खाती मिळणार? महत्वाची माहिती उघड

04 Jul 2023 11:46:41

Ajit Pawar  
 
 
मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्रीसुद्धा दाखल झाले आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यासंदर्भात चर्चा होणार आहे. यातचं अजित पवारांच्या गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदाची संभाव्य यादीची माहिती मिळते आहे.
 
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महसूल खातं मिळणार असल्याचं बोलले जात आहे. दिलीप वळसेंना सांस्कृतिक खातं, हसन मुश्रीफांना कामगार मंत्रीपद, छगन भुजबळ यांना ओबीसी विकास खात, तर धनंजय मुंडेंकडे सामाजिक न्याय खातं जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
 
 
काँग्रेस आणि ठाकरे गटाची आज बैठक!
 
राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची आज ३ जुलै रोजी बैठक होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाची बैठक मातोश्रीवर दुपारी 12.30 सुरू होणार आहे. या बैठकीत आमदार, खासदार, नेते, उपनेते उपस्थित राहणार आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाची ही पहिली बैठक होणार आहे.
 
 
नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल!
 
रविवारी, २ जुलै दुपारपासून राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आज सकाळापासून अनेक खलबतं सुरु आहेत. नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तर जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहेत. सिल्व्हर ओक येथे जयंत पाटील दाखल झाले आहेत. तर यानंतर शरद पवार ही वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहे. या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0