मुंबई : दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी मोठा आदेश दिला आहे. एसटीमधून दिव्यांग व्यक्तींना प्रवासात 'युडीआयडी कार्ड' ची नक्कल प्रत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, मुळ मूळ युडीआयडीची मागणी करु नये, असे आदेश एसटी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक यांना दिले आहेत.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी एसटी महामंडळाच्या विरुद्ध अपंग कल्याण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर अपंग कल्याण आयुक्त देशमुख यांनी मुख्य व्यवस्थापक एसटी महामंडळ यांना आदेश दिले आहेत. याबाबत अपंग आयुक्तांनी दोन वेळा सुनावणी घेतली.
राजेंद्र वाकचौरे, चांद शेख व महाव्यवस्थापक(वाहतूक), उपमहाव्यवस्थापक यांचे म्हणने ऐकून घेऊन महाव्यवस्थापक यांनी अहवाल मागीतला त्यानंतर निकाल देताना सर्व बाजूंचा विचार करून अखेर अपंगांच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयामुळे सर्व अपंग बांधवांकडून राजेंद्र वाकचौरे यांचे अभिनंदन केले जात आहे.