ठाणे : पाचपाखाडी येथील बॉर्निओ ह़ॉस्पीटलमध्ये पोटात असलेला दिड किलोचा ट्युमर योग्य वेळेत काढल्याने एका महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टराना यश आले.
ठाण्यात राहणारी ३५ वर्षीय महिला गेले काही महिने पोट दुखीने हैराण होती. सोनोग्राफी केली असता तिच्या अंडाशयाच्या जागी पोटात एक टयुमर (गाठ) वाढलेला दिसत होता. हा ट्युमर (गाठ) फुटला असता तर, त्या महिलेच्या पोटात रक्तस्त्राव होऊन तिच्या जीवाला देखील धोका होता. बोर्निओ हॉस्पीटलमध्ये आल्यावर तिला तेथील डॉक्टरानी तपासले आणि तातडीने ती गाठ काढून टाकण्यासाठी ऑपरेशनचा सल्ला दिला.
त्यानुसार,बोर्निओ हॉस्पीटलमधील डॉ वृषाली गौरवार आणि डाॅ. हितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तास शस्त्रक्रिया करून दोन किलोवजनाची ती पोटात वाढलेली गाठ काढली. सोबत मूतखडा असल्याने तो मूतखडा ही त्याच ऑपरेशनच्या दरम्यान काढला.