युपी नव्हे महाराष्ट्रात ड्रग्ज तस्कर आबू खानच्या अतिक्रमणावर फिरला बुलडोझर!

31 Jul 2023 13:28:26
 
Abu Khan
 
 
नागपूर : गुंड आणि ड्रग्ज तस्कर आबू खानच्या अतिक्रमणावर नागपूर महापालिकेचा बुलडोझर फिरला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आपल्या पथकासह रविवारी दुपारी ताजबाग परिसरात पोहोचून गुंडाने केलेले अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जेणेकरून कारवाईदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येईल.
 
गँगस्टर आबू खान आणि सहजाद खान हे दोघे भाऊ शहरात ड्रग्ज विकायचे आणि लोकांना धमकावून अवैध वसुली करायचे. यादरम्यान आरोपींनी महापालिकेच्या व ताजबागच्या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्यावर घरे व दुकाने बांधली होती. ज्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे रविवारी (३० जुलै) महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक बळासह पोहोचले आणि आरोपींनी बेकायदा अतिक्रमण करून बांधलेले घर व दुकान बुलडोझर चालवण्यात आला.
 
मात्र, या वेळी पथकाला विरोधाचाही सामना करावा लागला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांमुळे त्यांना ते जमले नाही. फिरोज उर्फ अबू खान याच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी, चोरी, घरफोडी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीवर बेकायदेशीर कब्जा असे ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आबु वर मोक्का लावला होता तेव्हापासून तो फरार होता. नागपूर पोलीस अबू खानचा शोध घेत होते. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा दहशत निर्माण केली.अबूचा भाऊ शहजाद खान आणि अमजद खान यांना १५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.अबू आणि त्याच्या भावांवर ताजबाग परिसरातील काही लोकांची जमीन हडप केल्याचा आरोप आहे.त्यामुळे पोलीस आयुक्तांनी खान बंधूंवर मोक्का अंतर्गत करडी नजर ठेवली होती.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0