शुक्रावर मानवी वसाहत उभारणार; टायटन पाणबुडी बनवणार्‍या ‘ओशनगेट’ची घोषणा

30 Jul 2023 22:17:29
OceanGate sending 1,000 humans to a floating colony on Venus by 2050

न्यूयॉर्क
: अटलांटिक महासागरात गेल्याच महिन्यात टायटन पाणबुडीची दुर्घटना घडली. ही पाणबुडी बनवणारी ओशनगेट या कंपनीने शुक्र या ग्रहावर वसाहत उभारण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे ‘ह्यूमन टू व्हेनस’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्या अंतर्गत येत्या २० वर्षात म्हणजेच २०५० पर्यंत शुक्र ग्रहावर वास्तव्य करण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले जाणार आहे. शुक्रावर उभारण्यात येणारी वसाहत ही तरंगती असेल, असे ओशनगेट कंपनीने म्हटले आहे. या योजनेचे नेतृत्व ओशनगेट कंपनीचे सह-संस्थापक गुलेर्मो सोनलेन करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.


Powered By Sangraha 9.0