महाराष्ट्र : राज्यातील जनतेला आरोग्य सुविधेचा लाभ व्हावा याकरिता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही अधिक व्यापक करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना व अधिवास प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दरम्यान, राज्यातील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून आता ५ लाखापर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणे यात वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून ५ लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला.