मुंबई : कामगार नेते दत्ता सांमत यांच्या हत्या प्रकरणात छोटा राजन याची कोर्टाने निर्दोष मुक्ताता केली आहे. गिरणी कामगारांची आर्थिक हेळसांड पाहून सामंतानी डॉक्टरी पेशा सोडून कामागारांचा 'डॉक्टरसाहेब' अशा पेशा धारण केला होता. १६ जानेवारी १९९७ ला घाटकोपर येथील ऑफिसला जाताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर या हत्येप्रकरणात छोटा राजन याच्यावर आरोप होते. त्याला न्यायालयाने पुरावा अभावी निर्दोष सुटका केली आहे.
सामंत हे मुंबईतील कामगारांचे प्रभावी नेते मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वात १९८२ मध्ये मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी पूर्ण दोन वर्षे संप केला. सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते पवईहून जीपने मुंबईतील पंतनगर भागात असलेल्या त्यांच्या कार्यालयाकडे जात होते. त्याच्यावर १७ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
खुनाच्या वेळी सावंत यांचा ड्रायव्हरही गाडीत होता. सुनावणीदरम्यान त्यांची चौकशीही करण्यात आली. दत्तावर चार जणांनी गोळीबार केल्याचे त्याने सांगितले होते. चालक जखमी अवस्थेत वाहनातून बाहेर पडला. मात्र दत्ता यांना रुग्णालयात नेले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.