मोठी बातमी! भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर!

29 Jul 2023 11:32:37
 
BJP National Team
 
 
मुंबई : २०२४च्या आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे.
 
भाजपने राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातून विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री, पंकजा मुंडे भाजप राष्ट्रीय सचिवपदी, विजया रहाटकरांवरही सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0