कहाणी चंदूभाई विराणींची
मोहित सोमण Exclusive -औद्योगिक क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे चंदूभाई विराणी.अगदी रोज आवडीने खाणारे बालाजी वेफर्स खाणारे देशात कमी नाहीत. सुरूवातीला अगदी लेझ, कुरकुरे, त्या आधी पेपी हे वेफर्सचे ब्रँड घराघरात पोहोचले होते. नंतर पुढे वेगवेगळे फ्लेवर्स सुरू झाले. मग ते मसाला, टोमॅटो,चिली, सॉल्टेड, पेरिपिरी हे वेगवेगळे फ्लेवर्स लोकप्रिय झाले. त्यांची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे.अगदी आजही जेव्हा आपण लोकल ट्रेन मध्ये पाहतो अनेक जण पोटाची भूक शमविण्यासाठी चरचर वेफर्स खातात. त्याचा वासाचा घमघमाट सुटला की आपलीही वेफर्सची इच्छा होते. बालाजी वेफर्सने आपल्या उत्पादनाची इतकी मोठी रेंज आणि फ्लेवर्स आणले तेवढे क्वचितच दुसरया कंपनीचे प्रोडक्ट लाईन असेल.
त्यातील नंबर १ बालाजी वेफर्स.छोट्या मोठ्या सगळ्या रिटेल होलसेल मार्केटमध्ये हा ब्रँड उपलब्ध आहे.आज त़ ब्रँड लेझ,कुरकुरे ला टक्कर देऊन लोकप्रिय आहे.परंतु ही कंपनी आजवर इथपर्यंत कशी पोहोचवली हा प्रवास थक्क करणार आहे.हे यश उभारण्यात सर्वात यशस्वी वाटा कोणाचा असेल तर तो चंदूभाई विराणी यांचा.
कोण आहेत चंदूभाई विराणी?
गुजरात मध्ये जन्मलेल्या चंदूभाई विराणी यांनी असामान्य कष्ट घेतले.फार कमी जणांना माहिती असेल त्यांनी आपल्या करियरची सुरूवात थिएटर मध्ये गेट किपर म्हणून केली.सुरूवातीला छोट्या मोठ्या उद्योगांना त्यांनी प्राधान्य दिले.७०-८० चा दशकात त्यांनी प्रामाणिकपणे आपली नोकरी करत सगळ्यांचे गळ्यातले ताईत बनले.काही कारणांमुळे थिएटर मध्ये कॅन्टीन चालवणारा ठेकेदार दुसरीकडे गेला तेव्हा चंदूभाई विराणी यांना कॅन्टीन चालू ठेवण्याची संधी मिळाली.ते चालवताना त्यांनी सुरूवातीला वेफर्स,समोसा विक्रीस सुरूवात केली.
हळूहळू जम बसल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात समोसा,वेफर्सचे उत्पादन सुरू केले.त्यानंतर काही जणांनी त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सल्ला दिल्यावर त्यांनीही ओळखले की आता योग्य वेळ आली आहे. परंतु मोठा कारखाना सुरू करण्यासाठी करोडो रूपयांची मशिनरी आवश्यक होती.जरी गुजरात मधील राजकोट आणि आसपासच्या भागात ते लोकप्रिय झाले तरी मात्र आता त्यांना कदाचित आकाश ठेंगणे झाले असावे.
पैशाच्या चणचण भासल्यावर त्यांनी आपल्या जुन् थिएटर मालकाची भेट घेतली.तो मालक त्यांचा यशावर नेहमीच खुष होता.त्याने सांगितले तुला जितके पैसे पाहिजे तितके मिळतील काळजी करू नकोस. ५० कोटी रुपये आणायचे कुठून या चिंतेने सतावत असलेल्या चंदूभाई विराणींना काहीसे हायस वाटले.परंतु एक दिवस अचानक जुने शेठ मी पैसे देऊ शकत नाही म्हटल्यावर ते चिंतित झाले.आपण तर यांच्यावर अवलंबून आहोत आता ५० कोटी आणायचे कुठून?
तेवढ्यात त्यांचे जुने मालक त्यांना उद्देशून म्हणाले,'अरे मी पैसे देणार नाही पण तुला पैसे मिळतील.बँक तुला कर्ज देईल त्यांचा गॅरेंटर मी होतो.माझ्या जमीनीच्या किमतीवर तुला कर्ज नक्की मिळेल.'
आणि खरोखरच कर्ज मिळालं त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.आज जगभरात बालाजी वेफर्स मिळतात.राजकोट पासून सुरू झालेला प्रवास हा गगनभरारी घेऊ पाहत आहे.मेहनत केली तर सगळं शक्य आहे.कुंडलीत यश लिहिले नसेल तरी विजयश्री खेचून आणण्याची धमक चंदूभाईंचा उदाहरणांतून मिळते.सुरुवातीला शेतकरी वडील पोपटभाई विराणी यांच्या कडून २०००० हजार उसने घेऊन चंदूभाई आता जगभरात वेफर्स स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.
इकनॉमिक टाइम्स ने तर त्यांना सुलतान ऑफ वेफर्स म्हणून संबोधले आहे.आज या कंपनीची आर्थिक उलाढाल ४००० कोटींहून अधिक आहे.आता बालाजीचे येणाऱ्या काळात काय वाटचाल होईल ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.