MahaMTB युट्यूब चॅनलने ओलांडला दोन लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा!

28 Jul 2023 17:33:24
MahaMTB Youtube Channel Reached 200K Subscribers 

मुंबई
: 'कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक', अशी ओळख असणाऱ्या दै.'मुंबई तरुण भारत'च्या महाMTB या ऑनलाईन आवृत्तीने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. 'समर्पित राष्ट्रभक्तीचा आधुनिक विचार', घेऊन पुढे जाणाऱ्या MahaMTB युट्यूब चॅनलचे गुरुवार, दि. २७ जुलै रोजी एकूण दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर वर्षभरातच प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यापूर्वी युट्यूबतर्फे 'महाMTB'ला सिल्वर बटण देत गौरविण्यात आले आहे.

माहितीच्या महापूरात नेमका मजकूर पोहोचवण्याच्या महाMTB संकल्पाला प्रेक्षकांचीही तितकाच उदंड प्रतिसाद लाभला. राजकारण, समाजकारण, पर्यावरण, अर्थकारण, मनोरंजन व साहित्य या सर्वच विषयांतील मजकूर निर्मिती. यातील उजवेपण जपताना सर्जनशीलता, सातत्य आणि नवनवीन प्रयोगांची सांगड आणि त्याला मिळणाऱ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद यातूनच 'महाMTB'च्या टीमला नवनवीन आशयनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळत असते.

महाMTB वाईल्डलाईफ अंतर्गत सुरू असलेल्या Species & Habitats Awareness Programme, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर यांचे जागतिक घडामोडींवरील विश्लेषण तसेच राजकीय आणि सामाजिक घटनांवरील विविध निवेदकांमार्फत केले जाणारे विश्लेषण या सर्वच आशयाला आजवर मिळालेला उदंड प्रतिसाद हीच या कामाची पोचपवाती आहे. दै.'मुंबई तरुण भारत'ची ऑनलाईन आवृत्ती म्हणून 'महाMTB'वर काही दायित्व आपसूकच येते. त्यामुळे सेक्स, सेन्सेशनल, राष्ट्रविरोधी आणि गुन्हेगारीचे उद्दातीकरण करणारा मजकूर टाळला जातो. राष्ट्रप्रथम ही भावना दृष्टीपथात ठेवून मजकूर निर्मिती हेच ध्येय समोर ठेवून आशयनिर्मिती केली जाते. सहाजिकच प्रेक्षकांनी अशाप्रकारच्या मजकूरनिर्मितीलाही पसंती दर्शविली आणि महाMTBला यशाचा नवा पल्ला गाठता आला.

Powered By Sangraha 9.0