आनंदाची बातमी - 'या' क्षेत्रात पीएलआय देण्याचा सरकारचा मनसुबा - निर्मला सितारामन
नवी दिल्ली - भारत सरकार ने सध्या पेट्रोकेमिकल,केमिकल उत्पादन निर्मिती साठी भारताची महत्वाकांक्षी पीएलआय ( प्रोडक्शन इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह) ही सरकार लागू करण्याचा विचार करत आहे असे विधान नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले आहे.
'सरकार २०४७ पर्यंत एनर्जी क्षेत्रात स्वावलंबी होऊन परिवर्तनासाठी मार्गक्रमण करत आहे. ज्यामध्ये २०७० पर्यंत ' नेट झिरो' ध्येय भारताला गाठता येईल.'नेट झिरो हे सगळ्या औद्योगिक क्षेत्राच्या योगदानाने गाठणे शक्य होईल.सध्या ग्रीन ग्रोथ वर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. म्हणून सर्वांगाने प्रत्येक क्षेत्राने भरीव कामगिरी केली पाहिजे ' अस निर्मला सितारामन यांनी गोल्बल केमिकल आणि पेट्रोकेमिकल पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चर हब इन इंडिया समिट या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले.
सध्या भारतात उत्पादन निर्मिती आणि क्षमता वाढवण्यासाठी भारत सर्व स्तरावर पीएलआय धोरण राबवून उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मंत्रालयाकडून यासंबंधीची कागदोपत्रांची पुरती आणि बोली करिता रिबिडिंग प्रकिया पूर्ण करेल असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
पायाभूत सुविधा आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात गो ग्रीन साठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे.