मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज (२८ जुलै) दहावा दिवस आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बिलावरून विधानसभेत गरमागरामीची चर्चा झाली. मुंबई महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहाराचा भाजप आमदारांकडून पुनरुल्लेख करण्यात आला. शिवाय यावेळी भाजपा आमदारांनी ठाकरे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली.
मुंबईचा कोपरा अन कोपरा तुम्ही विकून खाल्लात. मुंबईच्या पर्यावरणावर बोलण्याचा उबाठा गटाला अधिकार नाही. देशातील सर्वात मोठा घोटाळा मुंबई महापालिकेत झाला. स्थायी समितीच्या टक्केवारीवर बोलणारे शाश्वत विकासावर बोलत आहेत. मुंबईकर येत्या काळात तुम्हाला चांगला धडा शिकवणार. मुंबईकरांसाठीच्या खरेदी करण्यात आलेल्या मृतदेहाच्या पिशव्यांमध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला. असं म्हणत भाजपा आमदारांनी ठाकरे पितापुत्रांना घेरलं.