लव्ह जिहादवर बोललं तर मिरच्या का झोंबतात?

28 Jul 2023 16:01:41

Atul Bhatkhalkar  
 
 
मुंबई : लव्ह जिहादवर बोलताना अनेकांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात ? लव्ह जिहाद च्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि याबद्दलचा कायदा या सदानाने लवकरात लवकर आणला पाहिजे अशी मागणी भाजपा मुंबई महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. अधिवेशनात बोलताना भातखळकरांनी हा मुद्दा मांडला.
 
भातखळकर म्हणाले, "लव्ह जिहादवर बोलायला गेलं की अनेकांच्या नाकाला एवढ्या मिरच्या का झोंबतात ? हा माझा सवाल आहे. लव्ह जिहादचा उल्लेख फक्त भाजपा, शिवसेनाच करतेय असं समजण्याचं कारण नाही. केरळच्या कम्युनिस्ट सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी मुख्यमंत्री असताना केरळमध्ये लव्ह जिहाद सुरु आहे. अशा प्रकारचं विधान केलं. केरळमधल्या चर्चने या संदर्भातले आरोप केलेत. आणि त्यामुळे लव्ह जिहादच्या प्रकरणाची चौकशी पण केली पाहिजे. आणि या संदर्भातला कायदासुद्धा लवकरात लवकर केला पाहिजे. धर्मांतरणाचा कायदासुद्धा आणला पाहिजे. अशी मागणी मी करतो आहे." असं भातखळकर म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0