नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरच्या रस्त्यावर कारमधून स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान गाझियाबादमध्येही काही तरुण चालत्या कारच्या गेटवर उभे राहून REEL काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण वाढदिवसाची पार्टी साजरी करून परतत होते.
दि. २६ जुलै रोजी रात्री भरधाव वेगात असलेल्या कारच्या खिडकीला लटकून दोन तरुण स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी स्टंट करणाऱ्यावर कारवाई केली.कारवाई करत असताना पोलिसांनी कारच्या नंबर प्लेटवरून कार मालकापर्यंत पोहोचून स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली. दुसरीकडे कार जप्त करण्यात आली आहे.मात्र एक आरोपी फरार असल्याचे पोलीसांनी सांगत, त्यांचा शोध सुरू असल्याचे ही पोलीस म्हणाले.