कर्नाटक काँग्रेस आणि हिंदू

27 Jul 2023 22:01:43
g parameshwara on Udupi case

अलीमतूल शैफा, शबनाझ आणि आलिया या तिघींनी वैद्यकीय वसतिगृहाच्या स्वच्छतागृहामध्ये सगळ्यांच्या नकळत मोबाईल लपवून ठेवले. कॅमेर्‍यामध्ये मुलींचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ या तिघींनी त्यांच्या कौममधील पुरुषांना पाठवले. इतकेच काय काही प्रसारमाध्यमांवरही हे फोटो आणि व्हिडिओे प्रसारित झाले. त्या मोबाईलमध्ये वसतिगृहातील सर्वच मुलींचे फोटो रेकॉर्ड झाले असतील. मात्र, प्रसारित झाले; ते केवळ निष्पाप हिंदू मुलींचे. त्यांच्याही नकळत चित्रित झालेले व्हिडिओ आणि फोटो. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आल्यानंतर अलीमतूल शैफा, शबनाझ आणि आलिया या तीन मुलींना त्या वसतिगृहामधून काढून टाकण्यात आले. या तिघींवर गुन्हाही दाखल करण्यात आला.मानवतेच्या आणि समाजाच्या दृष्टीनेही हे सगळे भयंकरच. केवळ हिंदू मुलींचेच आक्षेपार्ह चित्रीकरण करणे, यापाठी या तीन गुन्हेगार विकृत मुलींचा हेतू काय आहे, हे उघडच. ’द केरला स्टेारी’मधली असिफा ही नीच आणि दुष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करते असे वाटते; पण या तिघी? अलीमतूल शैफा, शबनाझ आणि आलिया या तिघी, तर असिफासारख्या प्रवृत्तीच्यांपेक्षाही विकृती आणि विद्वेष पसरवणार्‍या विषकन्याच आहेत. कर्नाटकमध्ये ‘किताब के पहले हिजाब’ म्हणत मागे राडा झाला होता. ‘माशाअल्ला, इन्शाअल्ला इस्लाम की राजकुमारी’ म्हणत, त्या सगळ्यांचे कौतुकही झाले. आता अलीमतूल शैफा, शबनाझ आणि आलिया यांचे हे घाणेरडे कृत्य पाहून, हे लोक काही म्हणणार आहेत की, नाही? छे! अपेक्षाही नाही. बिचार्‍या निष्पाप मुली. त्यांना हिंदू असण्याची इतकी किंमत मोजावी लागली. मात्र, यावर काँग्रेसशासित कर्नाटक सरकारचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले की, ”उडुपीची घटना अतिशय छोटी आहे आणि त्या घटनेला राजकीय रंग देण्याची गरज नाही.” डॉ. जी. परमेश्वर आणि काँग्रेससाठी ही छोटी घटना आहे. असेलही. आपआपली संस्कृती. पण, तरीही कुठेतरी माणुसकी आणि संवेदना जीवंत आहे की नाही? ज्या निष्पाप मुली या घटनेच्या बळी झाल्या, त्या पीडितांना काय वाटत असेल? काय सोसावे लागले असेल? हे शब्दातही सांगू शकत नाही. सत्तेसाठी सुंता करणार्‍यांना हे कळणार कळले, तरी ते सत्तेसाठी गप्प बसतील का? तसेही टिपू सुलतानचे महात्म्य गाणार्‍या कर्नाटक काँगे्रेस सरकारकडून अपेक्षा काय करावी? कर्नाटकमधील हिंदूंच्या पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे देव जाणे!


राजस्थानमध्ये हुकूमशाही!

राजस्थान विधानसभेमध्ये मणिपूरच्या घटनेबद्दल सत्ताधारी काँग्रेस पक्ष निषेध नोंदवत होता. त्याचवेळी काँग्रेसचे राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र गुढा म्हणाले की, ”फक्त मणिपूरबद्दल बोलण्यात अर्थ नाही, आपणही आपल्या राज्यात महिलांना योग्य सुरक्षा देऊ शकत नाही.” सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), गृहरक्षक आणि नागरी संरक्षण (स्वतंत्र प्रभार) पंचायती राज आणि ग्रामीण विकास विभागचे राज्यमंत्री असलेले गुढा हे म्हणाले आणि काँग्रेसमध्ये भूकंपच आला. इतका की, काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुढा यांचे राज्यमंत्रिपद तडकाफडकी काढून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी गुढा पुन्हा विधानसभेत आले. त्यावेळी त्यांच्या हातात लाल डायरी होती. त्यात म्हणे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भ्रष्टाचाराचे कारनामे नोंद केलेले होते. मात्र, गुढा यांना जबरदस्तीने विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. गुढांच्या म्हणण्यानुसार, “काँग्रेसच्या ५० लोकांनी त्यांना मारहाण केली.”
मात्र, गुढांना त्यांचे मत मांडण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांच्याकडे असलेल्या लाल डायरीत असे काय होते की, ज्याची भीती मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सगळ्या काँग्रेसला वाटली. कॉँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न मानू. पण, राजेंद्र गुढा राजस्थानमधील उदयपुरावाटीच्या जनतेचे प्रतिनिधित्व करतात. दोन वेळा जनतेने विश्वासाने त्यांना निवडून दिले. विधानसभेत आमदार नाही बोलणार, तर कोण बोलणार? संविधानाने त्यांना तो हक्क प्रदान केला. मात्र, आपली सत्ता असताना सर्वत्र आपली स्तुती आणि न केलेल्या सत्कार्याबद्दल वाहवाही केली जावी, असेच जणू गेहलोत सरकारचे म्हणणे असावे.त्यामुळेच सत्ताधारी काँग्रेस विरोधात नव्हे, तर राजस्थानच्या महिला सुरक्षा समर्थनार्थ बोलणार्‍या राजेंद्र गुढा यांची सत्तेतून गच्छंती करण्यात आली. गुढा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी का केली गेली? त्यांनी काही देशविरोधी किंवा जनविरोधी वक्तव्ये, कृती केली नव्हती. ही खरेतर काँग्रसेची हुकूमशाहीच आहे. ‘संविधान खतरे मे हैं’, ‘लोकतंत्र खतरे मे हैं’ असे राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधीही सारखे उगीचच बरळत असतात. आता काँग्रेसमध्ये जे काही घडले आहे, राजेंद्र गुढावर जो अन्याय झाला आहे, त्यामुळे संविधान धोक्यात आले नाही का? हेच जर भाजपशासित राज्यात झाले असते तर?



 
Powered By Sangraha 9.0