हे पुणे आहे... इथे टिपूचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा कट्टरपंथीयांना इशारा

26 Jul 2023 12:04:59
 pune
 
पुणे : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात औंरग्याचे आणि टीपू सुलतानच्या उदात्तीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच काहीसा प्रकार काल पुण्यात समोर आला. एका दुचाकीवर टिपूचे चित्र लावून 'टिपू सुलतान, टायगर ऑफ मैसूर' अशा आशयाचे स्टिकर लावण्यात आले होते.
 
यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुचाकी मालकाला दोन वेळा सांगूनही टीपू सुलतानच्या उदात्तीकरण करणारे स्टिकर काढले नाही. यावर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला त्याच्या केश कर्तनालयच्या दुकानात जाऊन योग्य शब्दात तंबी दिली.
 
हे कार्यकर्ते शिवकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे होते. मुस्लीम तरुणाला बोलतांना ते म्हणाले की, 'इथे येऊन जगता, पैसे कमावता आणि वर आम्हालाच टिपूचे नखरे दाखवता. हे धंदे तात्काळ बंद करा'. सोबतच तात्काळ स्टिकर नाही काढले तर दुकान फोडून टाकण्याचा इशाराही कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता. या धमकीनंतर त्या तरुणाने गाडीवरचे स्टिकर काढले.
 
Powered By Sangraha 9.0