मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात!

26 Jul 2023 12:34:58

Mumbai Rain 
 
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्यात पावसाने हाहाकार केला आहे. कोकणात ही मुसळधार पाऊस सुरुच आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. तर, आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
 
मुंबईत गेले काही दिवस कोसळधारा सुरुच होत्या. मुंबईला रेड अलर्ट ही देण्यात आला होता. मात्र, आता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दादरच्या माटुंगा परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. शिवाय, अंधेरी सबवे ही पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0