मणिपूरच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अल्ताफ नाझीर खानला अटक

    26-Jul-2023
Total Views |
Manipur minor girl molested in pune 

पुणे
: कामाच्या शोधात आलेल्या मणिपूर येथील मुलीचा विनयभंग करीत तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी कोंढव्यातील तरुणाला कोंढवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अल्ताफ नाझीर खान (वय २१ रा. मालविल मशिदीजवळ, कोंढवा खुर्द) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची मणिपूर येथील राहणारी आहे. ही मुलगी साधारण एक महिन्यापूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आलेली होती. तीन बहिणींसह ही मुलगी कोंढव्यातील एका इमारतीमध्ये खोली भाड्याने घेऊन रहात होत्या.

पिडीत मुलगी घटनेच्या दिवशी रात्री इमारतीच्या जिन्यामधून जात होती. त्यावेळी आरोपी अल्ताफ खान याने तिला धक्का मारला. त्यामुळे तिचा तोल गेला. तिला सावरण्याचा बहाणा करुन त्याने तिच्याशी अश्लिल कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून बहिण बाहेर पळत आली. तिला पाहून अल्ताफ तेथून पसार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन अल्ताफला बेड्या ठोकल्या. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.