मुकेश माचकरचा पोलिसांकडून शोध सुरू : सडक्या मेंदूच्या कृतीचा निषेध

25 Jul 2023 19:32:05
posting casteist posts about Brahmin women



पुणे
: एका विशिष्ट समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी मुकेश माचकर याच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १५३ (अ) ५००, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माचकरच्या सडक्या मेंदूच्या विचारांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी अश्विनी कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ जुलै २०२३ रोजी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश माचकर या फेसबुक प्रोफाईलवरून भिडे, गाडगीळ आणि नाडकर्णी बाईला पोत्यात भरून मणिपूरला सोडण्यासाठी एक हजार रुपये वर्गणी देण्यात येईल. इतर काही प्लॅन असेल तर अर्धा लिटर पेट्रोल देखील देण्यात येईल, अशी वादग्रस्त पोस्ट केली. समाज माध्यमावर ही पोस्ट अपलोड करून व्हायरल केली. विविध जाती-धर्मांमध्ये शत्रुत्व वाढवून एकोपा बिघडवण्यास तसेच वर्गावर्गामध्ये द्वेषभाव निर्माण करून शत्रुत्व वाढविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच विशिष्ट वर्गाच्या महिलांची बदनामी होईल अशी पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुकेश माचकरचा शोध सुरू करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0