कर्नाटक : काही दिवसांपुर्वी कर्नाटकातील उडुपी येथे 'नेत्र ज्योती कॉलेज'च्या ३ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आल्याची बातमी समाजमाध्यामात प्रसिद्ध झाली. या प्रकरणात काही विशिष्ट समुदायाच्या विद्यार्थिनी कॉलेजच्या वॉशरूममध्ये कॅमेरा बसवले होते. दरम्यान ही घटनेची माहिती मिळताच निषेध व्यक्त करताना हिंदू संघटनांनी सांगितले की, पीडित तरुणी हिंदू समाजातील आहे. तसेच विशिष्ट समुदायातील तीन मुली आपल्या कॉलेजमधील काही मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्या समुदायातील मुलींना पाठवत, असे सांगण्यात आले आहे.
कर्नाटक : उडुपी कॉलेजमध्ये मुलींचा बनवला व्हिडिओ
ह्या प्रकरणाची बातमी उघडकीस आल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा असलेल्या रश्मी सामंत यांनी एक ट्विट केले आहे. त्याने लिहिले की अलीमातुल शैफा, शहबानाज आणि आलिया यांच्याबद्दल का बोलले जात नाही? मुळात रश्मी सामंत ही उडुपीच्या आहेत. दरम्यान या मुलींनी शेकडो हिंदू मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवले असल्याचे ही त्यांनी सांगितले. यासोबतच हे व्हिडीओ आणि छायाचित्रे आमच्या सोसायटीतील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पसरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
यासोबतच अशा अनेक पीडित मुली आहेत ज्या अशा नैराश्यात गेल्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही येत असल्याची माहिती त्यांनी दिली. असे असूनही या घटनेचा निषेध केला जात नसल्याचे रश्मी सामंत म्हणाल्या. तसेच, १९९२ च्या अजमेरमधील बलात्कार प्रकरणावर ही रश्मी यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, १९९२ मध्ये ही असेच प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे २५० हिंदू मुलींचे ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, असा दावा ही त्यांनी केला.
दरम्यान या उडुपीमधील प्रकरणात आरोपी मुलींना पकडल्यावर त्या तिन्ही मुलींनी दावा केला की, ते दुसऱ्या मुलीसोबत प्रँक करायला जात होते, मात्र चुकून दुसऱ्या मुलीचा व्हिडिओ बनवला गेला. यानंतर पीडित मुलींनी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली. महाविद्यालयाचे संचालक रश्मी कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, पीडित मुलींना पोलीस प्रकरणात अडकायचे नव्हते.पंरतू संस्थेने पोलिसांना निवेदन दिले. दरम्यान ज्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले ते फोनही तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
पोलीस रश्मी सामंत यांच्या घरात घुसले: वकील
रश्मी सामंतच्या या ट्विटनंतर कर्नाटक पोलीस तिच्या मागावर गेल्याचा आरोप आहे. अधिवक्ता आदित्य श्रीनिवास यांनी ट्विट केले की, सोमवारी (२४ जुलै २०२३) रात्री ८ वाजता कर्नाटक पोलिस अधिकारी रश्मी सामंत यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्या घरात नव्हत्या. यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांची चौकशी केली आणि त्यांची मुलगी कुठे आहे, अशी अनेक वेळा विचारणा केली. तिच्या वडिलांना अनेक फोन करून त्रास देण्यात आला आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या लोकेशनबद्दल विचारण्यात आले.
आदित्य श्रीनिवासन म्हणाले, “हे स्पष्ट आहे की पोलीस माझी क्लायंट रश्मी सामंत यांच्या मागे आहेत कारण तिने उडुपी येथील एका महाविद्यालयात हिंदू मुलींच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा निषेध केला होता. त्या एक मानवाधिकार कार्यकर्त्या असून देश-विदेशातील अनेक प्रश्नावर आवाज उठवत असतात. त्यांनी ब्रिटिश संसदेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये लेस्टरमधील हिंदूविरोधी हिंसाचाराचा अहवाल प्रकाशित केला. त्यांचे ताजे ट्विटही अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत करण्यात आले आहेत.
तसेच रश्मी यांच्या वकिलांने स्पष्ट केले की, रश्मी यांचे ट्विट घटनेच्या कक्षेत केले गेले असल्याने कर्नाटक पोलिसांनी अत्याचाराची असंवैधानिक पद्धत अवलंबली आहे. ते म्हणाले की, हा मुद्दा देशभर गाजला आहे, अशा परिस्थितीत रश्मी सामंत घराघरात गेल्यावर थांबणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत ते म्हणाले की, पोलीस अशा प्रकारे महिलेला अटक करण्यासाठी रात्री जाऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, रश्मी सामंतने तिच्या गृहजिल्ह्यात झालेल्या गुन्ह्याबाबत जनजागृती केली.
दरम्यान रश्मी सामंत यांच्या घरी कर्नाटक पोलिस येणे हा निव्वळ योगायोग नव्हता. याआधी AltNews च्या मोहम्मद झुबेरने ट्विट करून रश्मी सामंत आणि शेफाली वैद्य यांच्यावर निशाणा साधला आहे. हा मोहम्मद झुबेर तोच आहे. ज्यांने नुपूर शर्माचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केला होता,ज्यामुळे शर्मा यांना एक वर्षाहून अधिक काळ घरात कैद राहावे लागले होते. यानंतर कन्हैया लालची राजस्थानमधील उदयपूरमध्ये तर उमेश कोल्हेची महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
तसेच रश्मी सामंत लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मोहम्मद झुबेरने केला. त्याने तिच्यावर 'महिला कार्ड' खेळण्याचा आणि अज्ञात यूट्यूब चॅनेलचा हवाला देऊन अपप्रचार केल्याचा आरोपही केला. 'इंडिया टुडे'च्या लेखात चुकीची माहिती दिली आहे. तसेच ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा ही झुबेरने केला. त्याचबरोबर झुबैरने उडुप्पी पोलीसांना टॅग करत रश्मी सामंत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाला आहे.