मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाची चर्चा देशभरात होत आहे. यातच आता एक नवा खुलासा झाला आहे. सीमाचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता आहे. एटीएसने त्याला सोबत नेल्याचा संशय आहे. आधार कार्ड फसवणूक प्रकरणात एटीएस त्याची चौकशी करू शकते, असे म्हटले जात आहे.
तर, तुरुंगात आयुष्य घालवेन, पण पाकिस्तानात जाणार नाही. असं सीमाने सांगितल्यानंतरही सीमाला पाकिस्तानात पाठवण्याची तयारी करत आहेत. तिला लवकरच डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले जाऊ शकते. सीमाचे ओळखपत्र, तिचे आणि मुलांचे पासपोर्ट पाकिस्तान दूतावासात पाठवण्यात आले आहेत. एजन्सी पाकिस्तान सरकारला कागदपत्रे पाठवेल आणि सीमाचा अहवाल घेईल. सीमा ही त्या देशाची नागरिक असल्याचे पाकिस्तान सरकारचे मत असेल तरच तिला दूतावासाच्या ताब्यात दिले जाईल. अन्यथा पुराव्याच्या आधारे तिला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले जाईल.