मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला

25 Jul 2023 19:26:57
Marathi Author Shirish Kanekar Passed Away

मुंबई
: ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, शिरीष कणेकर हे चित्रपट, क्रिकेटचे एका अर्थाने माहितीकोश होते. एखादा प्रसंग रंजक करून कसा सांगायचा, यावर त्यांची हुकूमत होती. शब्दांवर त्यांची एवढी पकड होती की कोणताही प्रसंग ते शब्दांतून चित्रमय करू शकत. त्यांच्या लेखनात कायम कणेकरी बाज दिसायचा. त्यांच्या निधनाने समकालावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य करणारा भाष्यकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

Powered By Sangraha 9.0