मंगलप्रभात लोढांवर आरोप करणारे विरोधक तोंडघशी!

25 Jul 2023 18:05:17
 
Mangal Prabhat Lodha
 
 
मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना कार्यालय देण्यात आल्याने विरोधकांकडून प्रचंड टीका होत आहे. परंतु याच विरोधकांच्या मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहराचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना मलबार हिल मधील निवासस्थान देण्यात आले होते.
 
मंत्र्यांना महापालिका निवासस्थान देण्याची कोणतीही तरतुद नसताना शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांना ठाकरे सरकारने मलबार हिल मधील बंगला उपलब्ध करून दिला होता आणि या बंगल्यात पालकमंत्री रहात होते. त्यामुळे लोढा महापालिका मुख्यालयात कार्यालय देण्यावरून आकांडतांडव करणाऱ्या विरोधकांनी तेव्हा पालकमंत्री महोदयांना य मलबार मधील बंगला कोणत्या नियमानुसार दिला होता असा उपस्थित होत आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0