राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्यास सुरुवात

25 Jul 2023 20:10:54
Maharashtra Teacher Recruitment Has Been Started

मुंबई
: राज्यातील मशिक्षकांच्या रिक्त पदापैकी ३० हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. तसेच, शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी २२ फेब्रुवारी, २०२३ ते २३ मार्च,२०२३ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे ३० हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0