बापरे ! जपान भारतात इतक्या येनची गुंतवणूक करणार?

25 Jul 2023 17:35:49
 
 


Investment
 
बापरे ! जपान भारतात इतक्या येनची गुंतवणूक करणार?
 

जपान भारतात पाच ट्रिलियन यांची गुंतवणूक करण्यास इच्छुक- ज्योतिरादित्य सिंधिया
 
 
नवी दिल्ली : जपानचे अर्थ उद्योग व व्यापार मंत्री निशिमुरा यशुतोशी यांनी नुकताच राजधानी दिल्ली दौरा केला. त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची यावेळी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जपान भारतात ५ ट्रिलियन रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे असे उद्गार याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
 
आमची याविषयी सखोल चर्चा झाली आहे.यावेळी पायाभूत सुविधा, उत्तम विकासाची बांधणी व नव्या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण यासाठी भारत जपान या संदर्भात चर्चा झाली. स्टील उद्योगा व्यतिरिक्त इतर औद्योगिक क्षेत्रासाठी जपान येणाऱ्या काळात ५ ट्रिलियन येन इतकी गुंतवणूक करेल अशी चर्चा झाली असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पीटीआय बोलताना सांगितले.
 
येणारया काळात भारत जपान मधील गुंतवणुकीसाठी सहयोग पाहणे त्यामुळे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0