कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतले मदनदास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

24 Jul 2023 18:14:40
Karnataka Former CM Basavaraj Bommai

बंगळुरु
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचे सोमवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी बंगलोर येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळेजी, सह सरकार्यवाह मुकुंदा सीआर जी, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, विहिंपचे राष्ट्रीय कार्यवाह स्थाननुमलयन आणि इतर अनेकांनी मदनदास देवीजींना श्रद्धांजली वाहिली आहे. मदनदास देवीजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते संघटन मंत्री होते. तसेच सहसरकार्यवाह म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.
Powered By Sangraha 9.0