"मला चितळेंची बाकरवडी आवडते!", सुधा मूर्तींच्या कौतूकावर चितळे बंधू म्हणतात!

24 Jul 2023 15:28:25
Chitale Brothers Reacts On Sudha Murthy's Foody Video

मुंबई
: ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यात सुधा मूर्ती यांनी अनेक पदार्थांची जातीनं आठवण काढली आहे. विशेषकरून त्यांनी चितळेंची बाकरवडी आपल्याला प्रचंड आवडत असल्याचे कौतुक त्यांनी व्हिडीओत केले. तसं पाहिलं तर चितळेंची बाकरवडी जगप्रसिध्दच पण हा सोशल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खुद्द चितळे बंधूंनी हा व्हिडीओ पाहिला. त्यांनी यासर्वावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी याबाबत सुधा मूर्तींचे बाकरवडीवरचे प्रेम असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांच्याप्रती प्रेमपूर्वक आदर व्यक्त केला आहे.


दरम्यान, सुधा मूर्ती व्हिडीओत म्हणत आहेत, आपल्याला गुजरातचा ढोकळा, कोल्हापूरची बासुंदी तसेच पुण्याचे श्रीखंड भरपूर आवडत असल्याचे त्या या व्हिडीओच्या माध्यमातून सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान, लेखिका सुधा मूर्ती या प्रचंड खवय्या असून त्यांना भारताच्या विविध प्रांतांतले स्पेशल फूड्स खायला आवडतात. तसेच, त्यांनी प्रत्येक प्रदेशातल्या खाद्यसंस्कृतीचे पदार्थ आपल्याला खायला आवडतात, असेही त्या यावेळी सांगतात. 

Powered By Sangraha 9.0