धक्कादायक! मुलींच्या स्वच्छतागृहात लावले मोबाईल कॅमेरा, विशिष्ट समुदायातील ३ मुली निलंबित!

    23-Jul-2023
Total Views |
Three girl students suspended for placing a mobile camera in the bathroom

बेंगळुरू
: कर्नाटकातील उडुपी येथील एका खासगी महाविद्यालयातील महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल कॅमेरा सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विशिष्ट समाजातील ३ मुलींनी हा मोबाईल कॅमेरा स्वच्छतागृहात ठेवल्याचा आरोप संबधित प्रकरणातील लोकांनी केला आहे. या कॅमेऱ्यातून मुलीचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर या मुली आपल्या समाजातील मुलांसोबत व्हिडिओ शेअर करत, असे ही सांगण्यात येत आहे.

हे प्रकरण उडुपीच्या अंबालपाडी बायपासमध्ये असलेल्या नेत्र ज्योती कॉलेजशी संबंधित आहे. या कॉलेजमध्ये एका विशिष्ट समाजातील मुलीने दुसऱ्या समाजातील विद्यार्थिनींचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी स्वच्छतागृहात कॅमेरा लपवल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपी विद्यार्थिनी हे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवरून आपल्याच समाजातील मुलांना पाठवत होत्या. दरम्यान विशिष्ट समाजातील मुलांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

एवढेच नाही तर ही माहिती समोर आल्यानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या मुली आणि इतर विद्यार्थिनींमध्ये कॉलेजमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने प्रकरण शांत करताना तीनही आरोपी विद्यार्थिनींना कॉलेजमधून निलंबित केले आहे. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना ही बाब कळताच त्यांनी महाविद्यालय गाठून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
 
दुसरीकडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही आरोपी विद्यार्थिनींवर कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय सर्व कॉलेज स्टुडंट पॉवर ऑर्गनायझेशनने एसपी अक्षय हाके यांची भेट घेऊन याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. कॉलेज प्रशासनाने कारवाईच्या नावाखाली विद्यार्थिनींना निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

सप्टेंबर २०२२ मध्ये चंदीगड विद्यापीठातून असेच एक प्रकरण समोर आले होते. त्यानंतर एका मुलीवर कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांचे खासगी व्हिडिओ बनवून प्रियकराला पाठवल्याचा आरोप होता. पोलिसांच्या चौकशीत मुलीला इतर आरोपी व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले. त्यामुळेच ती मुलींचे व्हिडिओ बनवून आरोपी मुलांकडे पाठवत होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.