प्रधानमंत्री पीक विमा योजना शिबिराचे आयोजन

23 Jul 2023 17:32:35
Pradhan Mantri Crop Insurance Scheme Camp

शहापूर
: जिजाऊ संघटना कसारा शाखेच्या वतीने मोखावणे येथील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये १ रुपयात कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करु शकणार आहेत. खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल अशी माहिती जिजाऊ संघटनेचे जनार्दन भेरे यांनी दिली आहे. यामध्ये मोखावणे गावातील एकूण ४१ शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या निमित्ताने विहीगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम भोईर, मोखावणे कसारा ग्रा पं माजी उपसरपंच रमेश भोईर, जिजाऊ संघटनेचे कसारा विभागप्रमुख महेंद्र दशरथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरी भाऊ वेखंडे, शेखर चौधरी, सुभाष करवर, किशोर धसाडे उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0