G20 शिखर परिषदेसाठी प्रगती मैदानाचे ITPO संकुल सज्ज, २६ जुलैला पंतप्रधान करणार उद्घाटन!

23 Jul 2023 13:05:46
PM to inaugurate redeveloped ITPO complex on July 26 that will host G20 meetings
 
नवी दिल्ली : भारताच्या G२० नेत्यांच्या बैठका दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित ITPO कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. २६ जुलै रोजी या संकुलाचे उद्घाटन होणार आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) च्या मालकीच्या जागेच्या पुनर्विकासाची जबाबदारी NBCC (इंडिया) लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आली होती.

प्रगती मैदान सुमारे १२३ एकर परिसरात पसरलेले, हे कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठे MICE (मीटिंग, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन) कार्यक्रम आयोजित करेल. पुनर्विकसित आणि आधुनिक IECC कॉम्प्लेक्सचा जगातील १० सर्वात मोठ्या प्रदर्शन आणि अधिवेशन संकुलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हे जर्मनीतील हॅनोव्हर प्रदर्शन केंद्र आणि शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्राशी स्पर्धा करते.

७ हजार लोकांसाठी आसनव्यवस्था, आलिशान अॅम्फी थिएटर

IECC पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या भारताच्या क्षमतेची साक्ष देते. कन्व्हेन्शन सेंटरच्या लेव्हल ३ वर, ७,००० लोकांची आसनक्षमता आहे, तर ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित सिडनी ऑपेरा हाऊसची बसण्याची क्षमता अंदाजे ५,५०० आहे. याशिवाय, IECC कडे ३,००० व्यक्तींच्या आसनक्षमतेसह एक भव्य अॅम्फीथिएटर देखील आहे, जे ३ PVR थिएटरच्या समतुल्य आहे. येथे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.



 
व्यवसाय आणि नेटवर्किंगसाठी उत्तम व्यासपीठ

IECC येथे जागतिक स्तरावर मेगा परिषद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातील. यात उत्पादने, नवकल्पना आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी सात नाविन्यपूर्ण प्रदर्शन हॉलच्या जागा देखील उपलब्ध आहेत. हे अत्याधुनिक हॉल प्रदर्शक आणि कंपन्यांना त्यांच्या लक्ष्यित प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी, व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करतील.

५ हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

IECC ला अभ्यागतांच्या सोयीसाठी ५,५०० हून अधिक वाहनांसाठी पार्किंग देखील आहे. सिग्नलमुक्त रस्त्यांमुळे नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची सोय झाली आहे.


Powered By Sangraha 9.0