गायक मुकेश यांची १०० वी जयंती, नील नितीन मुकेशचे आग्रहाचे आमंत्रण

22 Jul 2023 16:17:21

neel and mukesh




मुंबई :
‘जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ?' हे अजरामर गीत देऊन गेलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांची आज १०० वी जयंती. मुकेश यांचे कुटुंबीयांकडून आज मुंबईतील मुकेश चौकात त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. मुकेश यांचा नातू नील नितीन मुकेश आजोबांच्या १०० व्या जयंतीविषयी बोलताना म्हणाला, ' माझे कुटुंब आणि मी माझ्या आजोबांची १०० वी जयंती साजरी मुकेशजी आणि आमच्या कुटुंबाबाला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांचा वारस होण्याचा विशेषाधिकार मिळणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि त्यांच्याप्रमाणे आम्हीही आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे मनोरंजन करू शकू अशी प्रार्थना करतो. आमच्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.
 
मुकेश चांद माथूर, म्हणजे मुकेश. आई-वडिलांच्या १० अपत्यांपैकी मुकेश हे ६ वे अपत्य होते. लहानपनापासूनच त्यांचा संगीताची आवड होती. सुप्रसिद्ध अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांना त्यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात गाताना पहिले आणि त्यांची प्रतिभा ओळखली. मोतीलाल यांनी १७ वर्षाच्या मुकेशला मुंबईत आणले आणि त्यांची संगीत दिग्दर्शकांशी ओळख करून दिली. १९४५ मध्ये आलेल्या 'पहिली नजर' चित्रपटातील ‘दिल जलता है तो जलने दे’, हे मुकेश यांचे पहिले सुपरहिट गाणे होते. १९४७ साली प्रदर्शित झालेल्या ‘आग’ चित्रपटातील भारतातील सर्वात मोठे शोमॅन राज कपूर यांच्यासाठी त्यांनी 'जिंदा हू इस तरह के' हे गाणे गायले. ‘सजन रे झूट मत बोलो’,’ रुक जा वो जानेवाली’,‘मेरा जुता है जपानी’ अशी बरीच हिट गाणी त्यांनी गायली आहेत. ३५ वर्षांच्या गणाच्या कारकिर्दीत मुकेश यांनी १२ भाषांमध्ये १०५४ गाणी गायली आहेत.
Powered By Sangraha 9.0