पुणे : पुणे आरटीओने ७०९ शालेय बसेसची तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान १७८ शालेय बसेसवर नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. शालेल बसेसची तपासणी करण्यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आला आहे. या स्कॉडकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
या स्कॉडने आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनूसार ७०९ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यातील १७८ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. या बसेसच्या मालकांकडून आतापर्यत 29 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शालेय बसेसच्या तपासणी करण्याचे आदेश दिले होते. शालेय बसेसच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. शाळेकरी मुलांच्या बसेसमध्ये पुरुष हेल्पर तर मुलींच्या बसेसमध्ये महिला हेल्पर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.