इन्फोसिसचा शेअर 'इतक्या' टक्क्यांनी घसरला!

21 Jul 2023 17:02:23

infosys

मुंबई : भारतातील नामांकित आयटी कंपनी इन्फोसिस या कंपनीचे भाग भांडवलाचे भाव शुक्रवारच्या पहिल्या सत्रात १० टक्क्याने घसरले आहेत. इन्फोसिस, परिसिटंट , विप्रो, एचसीएल टेक या कंपनीना झालेल्या नुकत्याच झालेल्या तोट्याची परिणीती म्हणून सिस्टीम इंडेक्स तब्बल ५ टक्क्याने कोसळला आहे. गुरुवारी इन्फोसिस कंपनीचा तिमाही निकाल घोषित झाला.कंपनीचा वार्षिक उत्पन्न वाढीचा ४ ते ७ टक्क्यांची तुलनेत यंदा मात्र १ ते ३ टक्के इतकेच वार्षिक उत्पन्न वाढले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील आव्हानात्मक परिस्थितीत आयटी टेक्नॉलॉजी कंपनीची या तिमाहीत नफ्यात घसरण झाली.जूनचा तिमाहीत नफा ११ टक्के इतका वाढला असून तो ५९४५ कोटी रूपये इतका वाढला आहे. तज्ञांच्या मते अपेक्षित निकालापेक्षा कंपनीने नफा नोंदवला आहे. जून तिमाहीत व्यवसायिक करांचे मूल्य २.३ अब्ज डॉलर होते जे तत्पूर्वी २.१ अब्ज डॉलर होते. कंपनीने नुकतीच २ व्यवसायिक करार केले आहेत, असे इन्फोसिसचा वतीने सांगण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0