कोकणापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही 'रेड अलर्ट'

21 Jul 2023 16:50:40
Heavy RainFall Predicted In Vidarbha Region

मुंबई
: राज्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु असून त्याचा रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकण भागास पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दरम्यान, मुंबईतील पावसामुळे वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. तसेच, रायगड , पालघर , मुंबई , मुंबई उपनगर या भागांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असून येत्या तासाभरात मुसळधार पावसाचा इशार देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार , गडचिरोली, विदर्भ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकण, सातारा कोल्हापूर , पुणे या घाट परिसरातील प्रवास शक्यतो टाळण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, जुन्या इमारती कोसळण्याचा धोका निर्माण होतो, रस्ते व रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो. असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येतो.

Powered By Sangraha 9.0