उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनकडून रेनकोट वाटप

21 Jul 2023 15:07:01
Annasaheb Patil Development Foundation Distributed Raincoats

मुंबई
: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने तब्बल ६०० महिला कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. दरम्यान, स्व.आ. अण्णासाहेब पाटील यांच्या चळवळीला वेळोवेळी न्याय देणारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा येत्या २२ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याकरिता महाराष्ट्र भाजपकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपकडून महाराष्ट्रात करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माथाडी कामगार नेते, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा), भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून दि. १९ जुलै २०२३ रोजी माथाडी भवन येथे आयोजित सेवा कार्यक्रमात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील तब्बल ६०० महिला पालावाला कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले.

तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणाऱ्या महिला पालावाला कामगार या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असतात. महिला पालावाला कामगार या स्वतः कुटूंब चालवतात व कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा अधिक मेहनत घेत असतात. बऱ्याच वेळा महिला कामगारांना पावसाळ्यात पाऊसा पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रेनकोट विकत घेणेसुद्धा जिकिरीचे असते. परिणामी त्यांना बऱ्याच आरोग्याच्या समस्या उदभवत असतात, ही बाब लक्षात घेऊन अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने महिला पालावाला कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे, असे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी प्राना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्राची पाटील, न.मुं.म.पा नगरसेविका भारती पाटील, भाजयुमो नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक विजय राणे, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे वरिष्ठ पदाधिकारी पोपटराव देशमुख, महिला कार्यकर्त्या रेखा म्हात्रे, उमा शेलार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0