मुख्यमंत्री इर्शाळवाडीकडे रवाना! भर पावसात मदकार्य सुरू

20 Jul 2023 14:28:59
Eknath Shinde
 
 
मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात दरड कोसळल्याने गाव ढिगाऱ्याखाली गेले आहे. दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. ही दुर्घटना ज्या भागात घडली तो भाग अतिशय दुर्गम आहे. कोणतीही गाडी तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिड तासाचा रस्ता पायी चालून पार करावा लागला.
 
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे.
 
रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. मुख्यमंत्र्यांसोबत घटनास्थळी गिरीश महाजन, उदय सांवत. दादा भुसे हे देखील हजर आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0