आता ठाणे महापालिका शाळांमध्ये 'थिंक बिग स्पेस' उपक्रम
02 Jul 2023 20:25:46
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६० आणि क्रमांक ११२ मध्ये ठाणे महापालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थिंक बिग स्पेस हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते आणि एडब्ल्यूएसचे साजी पीके तसेच माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाचा फायदा वंचित समूहातील तसेच सहा ते १५ वर्षे वयोगटातील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित (STEAM) विषयांमध्ये विद्यार्थ्यांची आवड जोपासण्यावर केंद्रित असलेला उपक्रम आहे. या कार्यक्रमास माजी नगरसेविका उषा भोईर, कॉर्नेलिया रॉबिन्सन आणि गायत्री प्रभू, तसेच, पालिकेचे शिक्षण उपायुक्त उमाकांत गायकवाड उपस्थित होते.
याबाबत आयुक्त बांगर, म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि क्षमता दाखविणाऱ्या या कार्यक्रमासाठी ठाण्यातील अनेक शाळांमधून या मनपा शाळांची निवड केल्याचा आम्हाला आनंद आहे. एकत्रितपणे, आम्ही आमच्या मुलांना या प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास आणि या विषयात त्यांची जिज्ञासा विकसित करण्यास सक्षम करू.”असे नमूद केले.