अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का?

02 Jul 2023 13:37:57
Ajit Pawar news

मुंबई
: विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल होणार आहेत. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? , प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. दरम्यान अजित पवार यांचे PA राजभवनात दाखल झालेले आहेत.

काही दिवसांआधी मला विरोधी पक्षनेते पद नको मला संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणीवजा नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली होती. तसेच आज प्रदेशध्याक्ष पद अजित पवारांकडे येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजभवनावर अजित पवारांच दाखल होण्याला फार महत्त्व आलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून रवाना झाला आहेत. त्यामुळे अजित पवार हे सरकारमध्ये सामील होणार असल्याचे सूत्राकडून सांगितले जात आहेत. तसेच देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

 
Powered By Sangraha 9.0