दिपकला फाउंडेशनचे कलावंतांना व्यासपीठ

19 Jul 2023 16:27:32

art 
 
मुंबई : मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. ५ ते ११ सप्टेंबर, २०२३ हया दरम्यान महाराष्ट्र आर्ट फेअर चे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांना आणि व्यावसायिकांना कलेच्या माध्यमासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा या हेतूने दीपकला फाऊंडेशनतर्फे “महाराष्ट्र आर्ट फेअर” चे आयोजन करण्यात आले आहे.
 
सदर प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील वकील, इंजिनीअर, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बॅंकर्स तसेच इतर असे अनेक व्यावसायिक व उद्योजकांनी छंद म्हणून जोपासलेल्या फोटोग्राफी, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलाकृतींचा समावेश करण्यात येणार असून त्यांच्या कलेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. तरी इच्छुकांनी आपली कला सादर करण्यासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन दीपकला फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9356469605 क्रमांकावर किंवा maharashtraartfair@gmail.com वर संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0