मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

19 Jul 2023 18:39:59
Maharashtra CM Eknath Shinde On Heavy Rainfall

मुंबई
: राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. तसेच, नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच, राज्य शासनाच्या निर्देशांनुसार अंधेरी, सीएसएमटी, दादर , भायखळा या स्थानकांबाहेर बसेसची सोय करण्यात आली आहे. 

दरम्यान, सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असे ते म्हणाले. तसेच, एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ च्या तुकड्या तैनात असून मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


Powered By Sangraha 9.0