विरोधी पक्षांच्या महाआघाडीत फूट?; 'INDIA' नावावर नितीश कुमारांचा आक्षेप

19 Jul 2023 15:00:38
Bihar CM Nitish Kumar On Oppositions Alliance Named INDIA

नवी दिल्ली
: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीचे नाव भारत कसे असू शकते, असा परखड सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घोषणा केली की २०२४ मध्ये सत्ताधारी भाजपला सामोरे जाण्यासाठी संयुक्त रणनीती आखत असलेल्या विरोधी पक्षांच्या युतीला "इंडिया" म्हटले जाईल, यावर आता विरोधी पक्षांच्या आघाडीतले महत्त्वाचे नेते नितीश कुमारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच, युतीच्या नावावर न केल्याने नितीश कुमार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, दि. १७ ते १८ जुलै रोजी दोन दिवस विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक बंगळुरु येथे झाली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव 'INDIA' म्हणजेच, 'भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक' आघाडी असे नाव देण्यात आले. तसेच, दि. १८ जुलै रोजी झालेल्या बेंगळुरू कॉन्क्लेव्हमध्ये विरोधी आघाडीसाठी 'INDIA' या नावाची चर्चा होत असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील उपस्थित होते. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी आघाडीचे नाव "INDIA" असे जाहीर केले.


Powered By Sangraha 9.0