'त्या' व्हीडिओ संदर्भात किरीट सोमय्यांनी दिली प्रतिक्रीया... म्हणाले आरोपांची चौकशी करा!

18 Jul 2023 12:25:32
kirit somyya
 
मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हीडिओ मराठी वृत्तवाहिनीने प्रकाशित केला होता. किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. आता या व्हीडिओवर किरीट सोमय्या यांनी आपली बाजू मांडली आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
 
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” अशी विंनती किरीट सोमय्या यांनी या पत्रात देवेंद्र फडणवीसांना केली आहे.
 
हे व्हीडीओ समोर आल्यावर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आरोप केले होते. अंबादास दानवे म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आपण हा विषय उचलून धरणार आहोत. माझ्यासाठी महिलांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे”
 
पण आता किरीट सोमय्यांनी स्वता आरोपांची चौकशी करण्याची विंनती केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे. किरीट सोमय्यांनी या व्हीडिओच्या सतत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0